ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डबल डेटाची धमाकेदार ऑफर

आर्थिक संकटात सापडलेली आघाडीची टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डबल डेटाची धमाकेदार ऑफर आणलीये. कंपनी आपल्या काही रिचार्ज प्लॅनवर आधीपेक्षा दुप्पट डेटा देत आहे. कंपनी आता 249 रुपये, 399 रुपये आणि 599 रुपयांच्या रिचार्जवर दररोज 3GB डेटा देत आहे. वरील प्लॅन्समध्ये यापूर्वी कंपनीकडून दररोज 1.5GB डेटा दिला जात होता.[quads id=1]

249 रुपयांच्या प्लॅनची वैधता 28 दिवस, 399 रुपयांच्या प्लॅनची वैधता 56 दिवस आणि 599 रुपयांच्या प्लॅनची वैधता 84 दिवस आहे. ही ऑफर प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही ग्राहकांसाठी उपलब्ध असून सर्व 22 टेलिकॉम सर्कल्समध्ये याचा लाभ घेता येईल. युजर्स या ऑफरचा लाभ My Vodafone, My Idea आणि या दोन्ही कंपन्यांच्या वेबसाइटद्वारे घेऊ शकतात. हे तिन्ही रिचार्ज प्लॅन कंपनीच्या एक्स्ट्रा डेटा ऑफरचा भाग आहेत. या तिन्ही प्लॅनमध्ये आतापर्यंत कंपनीकडून दररोज 1.5GB डेटा मिळायचा. पण, आता कंपनीकडून 3GB डेटा दिला जात आहे. डेटाशिवाय या तिन्ही प्लॅन्सवर कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा फायदाही मिळेल. तसेच 100 एसएमएस आणि OTT अ‍ॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल. व्होडाफोनच्या ग्राहकांना Vodafone Play आणि ZEE 5 अ‍ॅपचे फ्री सब्सक्रिप्शन आणि आयडियाच्या ग्राहकांना Idea Movies आणि TV चे मोफत सब्सक्रिप्शन मिळेल.

 

व्होडाफोन-आयडियाच्या 599 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर पहिले एकूण 126GB डेटा मिळायचा, पण आता या प्लॅनमध्ये एकूण 252GB डेटा युजर्सना मिळतो. तर, 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये आता एकूण 84GB डेटाऐवजी 168GB डेटा मिळेल. याशिवाय, 249 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये आता एकूण 42GB डेटाऐवजी 84GB डेटा मिळेल.[quads id=1]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here