काही दिवसांपूर्वी अनुष्का क्रिकेटपटूला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या

गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा होत्या. अनुष्का उत्तर भारतातीय क्रिकेटपटूला डेट करत असल्याचे म्हटले जात होते. एकीकडे अनुष्का तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून दुसरीकडे तिच्या लग्नाचीही जोरदार तयारी सुरु असल्याचे म्हटले जात होते. तसेच हा क्रिकेटपटू कोण आहे याबाबत बरेच तर्कवितर्क चाहत्यांद्वारे लावले जात होते. पण या सर्व अफवा असल्याचे म्हणत अनुष्काने चर्चांना पूर्ण विरामा लावला.

आता ‘देवसेना’चे नाव एका दिग्दर्शकाशी जोडण्यात आले आहे. या दिग्दर्शकाचे नाव प्रकाश कोवेलमुडी असल्याचे म्हटले जात आहे. ‘आयबी टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार येत्या काही दिवसांमध्ये अनुष्का लोकप्रिय दिग्दर्शक प्रकाश कोवेलमुडीशी लग्न करणार आहे. मात्र अनुष्काने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे सर्वांच्या नजरा त्या दोघांकडे आहेत.

कोण आहे प्रकाश कोवेलमुडी?

प्रकाश हा तेलुगू चित्रपट दिग्दर्शक के राघवेंद्र राव यांचा मुलगा आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून देखील काम केले आहे. ‘जजमेंटल है क्या’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. प्रकाशने २०१७ मध्ये कनिका ढिल्लोंशी घटस्फोट घेतला आणि आता तो अनुष्का शेट्टीला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here