मुंबई |  Apple ने भारतात नवीन Mac Book Air आणि iPad Pro  हे दोन डिव्हाइस लाँच केले आहेत. यापैकी Mac Book Air हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त Mac Book तर  iPad Pro हा आतापर्यंतचा सर्वात पॉवरफुल आयपॅड असल्याचं सांगितलं जात आहे.

कंपनीने नवीन मॅजिक की-बोर्डसोबत Mac Book Air नवीन व्हेरिअंटमध्ये आणले आहे. नव्या Mac Book Airमध्ये दर्जेदार CPU परफॉर्मंस आणि 80 टक्के अधिक जलद ग्राफिक्स दिल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.[quads id=1]

Mac Book Air च्या नव्या व्हेरिअंटची बेसिक किंमत 92 हजार 990 रुपये ठेवण्यात आली आहे.
iPad Pro 11 इंच वाय-फाय मॉडेलची किंमत 71,900 रुपये आहे. तर, वाय फाय+ सेल्युलर मॉडेलची किंमत 85,900 रुपये आहे.

दरम्यान,  iPad Pro 12.9 इंच मॉडेलची किंमत 89,900 रुपये आणि वाय फाय+सेल्युलर मॉडेलची किंमत 1,03,900 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.[quads id=2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here