आपल्या एका कृतीमुळे समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडतो. आपण सांगितलेली गोष्ट तो ऐकतो आणि आपला चाहता होतो, अशी उदाहरणे स्वामी विवेकानंद यांच्या बाबतीत अनेकदा घडली आहेत. त्यांच्या वाणीने, विचारांनी आणि आचरणांनी अनेक जण प्रभावित झाले. काहींनी स्वामीजींचे थेट शिषत्वच पत्करले. स्वामीजींच्या कृतीमुळे एक इंग्रज अधिकारी प्रभावित झाला आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारला.

स्वामी विवेकानंदांनी इंग्रजाला दाखवला अहिंसा मार्ग
आपल्या एका कृतीमुळे समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडतो. आपण सांगितलेली गोष्ट तो ऐकतो आणि आपला चाहता होतो, अशी उदाहरणे स्वामी विवेकानंद यांच्या बाबतीत अनेकदा घडली आहेत. त्यांच्या वाणीने, विचारांनी आणि आचरणांनी अनेक जण प्रभावित झाले. काहींनी स्वामीजींचे थेट शिषत्वच पत्करले. स्वामीजींच्या कृतीमुळे एक इंग्रज अधिकारी प्रभावित झाला आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारला.
स्वामी विवेकानंदांना व्यायाम करायची खूप आवड होती. लहानपणापासून व्यायाम केल्यामुळे त्यांचे शरीर एकदम धष्ट-पुष्ट झाले होते. स्वामीजींच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते. त्यामुळे अनेक जण त्यांच्याकडे आकर्षित व्हायचे. एक दिवस मित्रांबरोबर व्यायाम करत असताना एक इंग्रज व्यक्तीशी त्यांचा वाद झाला. वाद इतका वाढला की, इंग्रज व्यक्ती हाणामारी करू लागला. विवेकानंदांवर त्याने हल्ला केला. हल्ल्यापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना व्यायामशाळेतील एका खांबाला विवेकानंदांचा हात लागला आणि तो खांब त्या इंग्रज व्यक्तीच्या डोक्यावर पडला.
इंग्रज व्यक्ती बेशुद्ध झाली. त्यांच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहायला लागल्या. या घटनेनंतर विवेकानंदांचे मित्र घाबरले आणि तेथून पसार झाले. मात्र, विवेकानंद तेथेच उभे राहिले. इंग्रज व्यक्तीची अवस्था पाहून विवेकानंद त्यांच्या सुश्रुषा करू लागले. जवळच्या भागातून स्वतः पाणी आणले आणि डोक्याला झालेली जखम स्वच्छ केली. डोक्यावर पट्टी बांधण्यासाठी जवळपास काही मिळते का, ते पाहू लागले. परंतु, कपड्याचा तुकडा काही त्यांना मिळाला नाही. शेवटी आपल्या सदऱ्याचा तुकडा फाडला आणि त्याच्या डोक्याला घट्ट बांधला. डोक्याला पट्टी बांधल्यावर रक्त वाहणे थांबले. विवेकानंदांनी इंग्रज व्यक्तीच्या डोळ्यावर पाणी मारले. हळूहळू ती व्यक्ती शुद्धीवर आली. स्वामी विवेकानंद तिथेच उभे राहून आपली मलमपट्टी करताहेत, हे पाहून इंग्रज व्यक्तीला एकदम आश्चर्य वाटले. त्या दिवसापासून ती इंग्रज व्यक्ती स्वामी विवेकानंदांची मित्र बनली. विवेकानंदांच्या त्या कृतीने इंग्रज व्यक्तीमध्ये अमूलाग्र बदल झाला. त्या व्यक्तीने अहिंसेचा मार्ग स्वीकारला. स्वामी विवेकानंद यांनी मला अहिंसा मार्ग दाखवला. ही शिकवण मी आयुष्यात कायम लक्षात ठेवेन, असे ती इंग्रज नेहम सांगते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here