Tuesday, October 20, 2020
Home Blog

जिओ नवा धमाका करण्याच्या तयारीत, 5जी स्मार्टफोन ३ हजारात देण्याचा विचार!

कंपनीच्या अधिकाऱ्याकडून समोर आली माहिती रिलायन्स जिओकडून ग्राहकांसाठी एक मोठा धमाका केला जाण्याची शक्यता आहे. ५ हजार रुपये किंमत असलेला 5जी स्मार्ट फोन आता अडीच ते तीन हजार रुपयांमध्येच ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले जात असल्याची माहिती, कंपनीच्या एका अधिकाऱ्याकडून समोर आली आहे. रिलायन्स जिओच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कंपीनेच लक्ष 2जी चा वापर करणाऱ्या २० ते ३० कोटी युजर्सवर आहे....

लॉकडाऊनमधली मैत्री

एके दिवशी सकाळी शेरा कुत्रा उठला. पाठीचा धनुष्य करत त्याने आळस दिला. एके दिवशी सकाळी शेरा कुत्रा उठला. पाठीचा धनुष्य करत त्याने आळस दिला. त्याचे मित्र चंकू आणि मंकू कुठे दिसतायत ते पाहायला तो जिन्यावरून खाली उतरला. रस्ता बऱ्यापैकी मोकळा होता. खरं तर यावेळी गाडय़ांची गर्दी रस्त्यावर असते. मुलांच्या आया आणि पाठीवर दप्तरांचे ओझे सांभाळत धावणारी चिमुरडी मुले रस्ता ओलांडून...

उद्यापासून सर्व महिलांना लोकल प्रवासाची परवानगी मिळणार?

आज निर्णय होण्याची शक्यता... समस्त महिला वर्गाला लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा विषय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मार्गी लावू शकतात. राज्य सरकारने घटस्थापनेच्या मुहूर्तावर शनिवारपासून महिला प्रवाशांना उपनगरीय रेल्वे प्रवासाची मुभा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोविडच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने सरसकट सर्व महिलांना प्रवासाची परवानगी देता येणार नाही, असे स्पष्ट केले होते. राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी या मुद्यावर केंद्रीय गृहसचिव...

“संकटाची जबाबदारी केंद्रावर टाकून नामानिराळं व्हायचं हे ठाकरे सरकारचं धोरण अयोग्य”

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका कोणतंही संकट आलं की त्याची जबाबदारी केंद्र सरकारवर टाकायची आणि नामानिराळं व्हायचं हे ठाकरे सरकारचं धोरण अयोग्य आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस हे बारामती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे. देवेंद्र...

‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटातील नवे गाणे प्रदर्शित

गाण्यात कियारा आणि अक्षय रोमँटीक अंदाजात दिसत आहेत. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित हॉरर कॉमेडी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’ दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणी अक्षयसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित झाले असून सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. अक्षय कुमारने ट्विटरद्वारे ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटातील नवे गाणे ‘बुर्ज खलीफा’ प्रदर्शित झाल्याचे...

शिवसेनेसोबत पुन्हा युती करणार का? अमित शाह यांनी दिलं ‘हे’ उत्तर

अमित शाह यांनी दिलं महत्त्वाचं उत्तर शिवसेनेसोबत पुन्हा युती करणार का? असा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आज विचारण्यात आला त्यावर अमित शाह यांनी दिलेलं उत्तर महत्वाचं आहे. ते म्हणाले “मी काही ज्योतिषी नाही, शिवसेना असो की अकाली दल आम्ही त्यांना बाहेरचा रस्ता दाखवलेला नाही. एनडीएमधून हे दोन्ही पक्ष स्वतःच बाहेर पडले आहेत. त्याला आम्ही काय करु शकतो” असं अमित...

निवृत्त पोलीस अधिकारी टी. के. चौधरी यांचे निधन

प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबई : राज्याचे निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक तुकाराम तथा टी. के. चौधरी यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत आयपीएस...

हास्य आणि भाष्य : त्वेषाने खोदलेली रेषा

विजयन ज्या पद्धतीने व्यंगचित्रं काढतात, त्यात त्वेष आणि राग दिसतो. ‘‘आपल्या देशातील असहाय, गरीब शेतकरी आणि त्याचा तितकाच असहाय, अस्वस्थ मुलगा यांना केंद्रस्थानी ठेवून मी जग बघतो आणि व्यंगचित्रं रेखाटतो. अमेरिकेतली मुलं- जी हसरी, आनंदी, सुखी असतात- किंवा तिथली सुबत्ता यांच्याशी मी स्वत: जोडला जाऊ शकत नाही. तिथल्या वातावरणाशी निगडित व्यंगचित्रं मी काढूच  शकणार नाही, कारण मी तिसऱ्या जगातील व्यंगचित्रकार...

मराठा आरक्षण: वेळ आल्यास घटना बदलण्यासाठीही अभ्यास सुरु-संभाजीराजे

संभाजीराजे छत्रपती यांचं महत्त्वाचं वक्तव्य मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर पुन्हा एकदा मराठा समाजाला अडचणींचा सामना करावा लागतो आहे. अशात मराठा आरक्षण हा मुख्यत्वे ठाकरे सरकारचा विषय आहे. यामध्ये केंद्र सरकारची मदत लागली आणि घटना बदलण्याचाही विषय असेल तर त्याबाबतही माझा अभ्यास सुरु आहे. असं वक्तव्य खासदार संभाजीराजेंनी केलं आहे. भाजपाचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पंढरपूरच्या महापुरानंतरच्या परिस्थितीची...

नवरात्रीचे उपवास करताय? हे लक्षात ठेवाच

Fasting-Food
Navratri 2020 : नवरात्रीत एक व्रत म्हणून भारतभर भक्तिभावाने उपवास केला जातो. स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, सुशिक्षित-अशिक्षित, शहरी-ग्रामीण अशा सर्व स्तरात हे उपवास केले जातात. देवीच्या या उपवासाने आध्यात्मिक पुण्य मिळत असेलही, शरीराचे आणि मनाचे शुद्धीकरणसुद्धा होत असेल, कदाचित मनाला एकप्रकारची स्थिरता व शांतीसुद्धा मिळत असेल; पण शरीराला कष्ट देऊन हे उपवास केले जात असल्याने अशक्तपणा येणे, चक्कर येणे, गरगरणे, तोंडाला...
20,764FansLike
2,646FollowersFollow
68,368FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest posts